चिंचवडमध्ये 57 लिटर हातभट्टीची गावठी दारू जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे दारूबंदी असतानाही 57 लिटर गावठी हातभट्टी दारू बाळगणाऱ्या एकाविरूद्ध चिंचवड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारत शिवराम कुदळे (वय 55, रा. उद्यमनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई अजित कुटे (वय 32) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कोराना रोखण्यासाठी लॉकडाऊन असून संचारबंदी लागू असतानाही शहरात दारू विक्री सुरू आहे. चिंचवड-उद्यमनगर येथे रेल्वे रूळाच्या बाजूला एका पत्राशेडमध्ये बेकायदा गावठी दारूचा साठा केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून छापा मारला. पोलिसांनी 5 हजार 700 रूपये किमतीची 57 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी कुदळे पसार झाला. त्याच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार मोईकर तपास करत आहेत.