लालबाग, परळ, शिवडीत आजपासून लॉकडाऊन कडक! फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
महत्त्वाचे रस्ते बंद केल्याने रस्त्यांवर असा शुकशुकाट आहे

पालिकेच्या एफ-दक्षिण विभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने लालबाग, परळ, शिवडी, भोईवाडा, अभ्युदय नगर परिसरात आजपासून 6 मेपर्यंत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने घेतला आहे. यामुळे या विभागात फक्त औषधे आणि अत्यावश्यक सेवेचीच दुकाने सुरू राहणार आहेत.

एफ-दक्षिण विभागात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३०० च्या वर पोहोचला आहे. त्यामुळे वॉर्डमधील शिवडी, लालबाग, परळ, भोईवाडा, अभ्युदय नगर आदी भागात विशेष काळजी घेणे महत्वाचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करणार असल्याचे प्रभाग क्र. 202 च्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी सांगितले. शिवडीतही कोरोना रुग्णांचा आकडा 42 वर पोहोचला आहे. त्यामुळे खबरदारी घेण्यासाठी आगामी काळात शिवडीतही लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करणार असल्याचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले. याबाबत रहिवासी, व्यापारी, पोलीस यांच्याशी चर्चा करून स्वयंस्फूर्तीने हा निर्णय घेण्यात आल्याचे पडवळ म्हणाले.