
सांगली जिल्ह्यात आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9 झाली आहे. गुजरातच्या अहमदाबादहून एक महिला सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथे आली होती. त्यानंतर या महिलेला जिल्हा प्रशासनाने होम क्वारंटाईन केले होते. मात्र, महिलेला त्रास होत असल्याने तिचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट रविवारी सायंकाळी मिळाला. ती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. आता तिच्यावर मिरज येथील शासकीय “कोवीड 19 हॉस्पिटल”मध्ये उपचार सुरू आहेत. सांगली जिल्ह्यातील ही नववी महिला रुग्ण आहे. जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर 26 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आता जिल्ह्यात या नवीन महिला रुग्णामुळे कोरोनाबाधितांची संख्या 9 झाली आहे.




























































