
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृती स्थिर आहे. सिंह उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
रविवारी डॉ. सिंह यांच्या छातीत दुखत होते. म्हणून त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले होते. सिंह याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या डॉ. मनमोहन सिंह डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. डॉ. सिंह यांची तब्येत बिघडल्यानंतर ते लवकर बरे व्हावे म्हणून सर्व स्तरातून प्रार्थना करण्यात आली होती.






























































