
रत्नागिरी जिल्ह्यात आज आणखी पाच कोरोनाबाधित रूग्ण सापडल्याने कोरोनाबाधित रूग्णांनी आता अर्धशतक गाठले आहे. आज सकाळी 16 जणांचे तपासणी अहवाल कोल्हापूर येथून अहवाल प्राप्त झाले असून यातील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 11 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 52 झाली आहे. त्यापैकी 46 रूग्ण उपचार घेत आहेत. गेल्या दहा दिवसात 48 कोरोनाबाधित रूग्ण जिल्ह्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी 40 हजार 10 लोकांनी अर्ज केले असून जिल्ह्यात येण्यासाठी 37 हजार 57 लोकांनी अर्ज केले आहेत.

























































