
तेलंगाणातून 21 वर्षीय मजूर आपल्या गावी पायीच निघाला होता. उपाशी पोटी या मजुराने 300 कि.मी पायी प्रवास केला आणि त्याचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे देशाच्या विविध ठिकाणी कामासाठी गेलेले मजूर अडकलेले आहेत. रविवारी हैदराबादमधून एक मजूर आपल्या मित्रांसोबत ओडिशाला आपल्या गावी पायीच निघाला. सकाळपासून त्याने कहीच खाल्ले नव्हते. तब्बल 300 किमी चालल्यानंतर हा मजूर कोसळला. त्याला उल्टी झाली तसेच त्याच्या छातीतही दुखत होते. त्याला तत्काळ भद्राचलम रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी मजुराला ब्रेनडेड घोषित केले.
जेव्हा मजुराला रुग्णालयात आणले होते तेव्हा तेव्हा त्याच्या शरीरात बिल्कूल पाणी नव्हते. त्याचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.























































