शेअर बाजारात 600 अंकाची घसरण, निफ्टीतही पडझड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शेअर बाजारात गुरुवारी सकाळच्या सत्रात 600 अंकांची घसरण पाहायला मिळाली. सकाळी10:30 च्या सुमारास शेअर बाजार निर्देशांक 31394.20 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीही 164.60 अंक म्हणजे 1.75 टक्क्यांनी घसरून 9218.95 अंकावर पोहोचला. जगभरात सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे बाजार मंदावला आहे.

केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या 20 लाख कोटींच्या पॅकेजमधील 15 महत्वाच्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी जाहीर केल्या होत्या. मात्र त्याचा बाजारावर आज फारसा प्रभाव दिसला नाही. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याचे पाहायला मिळाले.

आजच्या पहिल्या सत्रात आयटीसी , हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज , कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स या शेअरमध्ये घसरण दिसली. तर बजाज फायनान्स, नेस्ले, भारती एअरटेल असे शेअर तेजीत दिसले.