अफगाणिस्तानमध्ये रुग्णालयात दहशतवादी हल्ला, दोन नवजात बालकांसह 16 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन नवाजत बालकांसह 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच एका कब्रस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी अफगाणिस्तानच्या भारत दश्त-ए-बार्ची रुग्णालयात एका बंदुकधारी दहशतवाद्याने अंदाधुंद गोळी बार केला. या गोळीबारात 16 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यात दोन नवजात बालकांचाही समावेश आहे.तर एका अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एका सुसायडर बॉम्बस्फोटात 24 जणांचा मृत्यू झाला असून 68 जण जखमी झाले आहेत.

सरकारने याबाबत तालिबान्यांवर जवाबदार ठरवले आहे. पण हा हल्ला आपण केला नसल्याचे तालिबान्यांनी म्हटले आहे. हा हल्ला इसिसने केला असा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.