मुंबईहून जिंतूर तालुक्यात आलेल्या महिलेसह तिच्या दोन मुलांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई येथील आर्थर रोड तुरुंगात कामाला असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बायकोला आणि दोन मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.  हा पोलीस कर्मचारी मूळचा जिंतूर तालुक्यातील शेवडी या गावचा रहिवासी आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तो आपल्या परिवाराला घेऊन गावाला आला होता.

चौथ्या दिवशीही परभणीतून 121 परप्रांतीय मजुरांची स्वगृही रवानगी

पोलीस कर्मचारी कुटुंबासह गावाला आल्यानंतर तिथे पहिले त्याने त्याची बायको आणि दोन मुलांची तपासणी करून घेतली. तपासणी अहवाल येईपर्यंत पोलीस कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबाला डॉक्टरांनी क्वारंटाईन केले होते. गुरुवारी म्हणजेच 14 मे रोजी रात्री त्यांचा अहवाल आला. त्यामध्ये पोलीस कर्मचारी हे निगेटिव्ह निघाले आहेत. तर यांची पत्नी व दोन मुले हे पॉझिटिव्ह निघाले आहेत.

परभणीत टाळेबंदीत सतराशेहून अधिक वाहने जप्त,  दंडात्मक कारवाई सुरू

आरोग्य विभागाने पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना कोरोना वार्डात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य विभागातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. हे तीन रुग्ण आढळल्यानंतर शेवड़ी हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिंतूर नगरपरीषद हद्दीतील 3 कि.मी. परीसरामध्ये शनिवार 16 मे रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  जिल्हादंडाधिकारी तथा  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक मुगळीकर यांनी हे आदेश दिले आहेत. संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा वगण्यात येतील असंही सांगण्यात आलं आहे. संचारबंदीच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येईल अशी ताकीद देण्यात आली आहे.