
उत्तर प्रदेश राज्यातील 121 मजूर परभणी जिल्ह्यातील विविध भागात लॉक डाऊन मुळे अडकले होते. गुरूवारी या सर्व मजुरांना जिल्ह्यातील 5 बसद्वारे संभाजीनगर रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे योग्य ते पालन संबंधितांद्वारे करण्यात आले. उत्तर प्रदेश राज्यातील 121 मजुरांना संभाजीनगर येथील रेल्वे स्थानकापर्यंत एकूण 5 एसटी महामंडळाच्या बसेस द्वारे आज रवाना करण्यात आले,अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.


























































