
दादरमध्ये टिळक भवन परिसरातील एकाच सोसायटीतील चारपैकी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर पाच दिवसांत संबंधित रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. दरम्यान, या रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
या परिसरात असलेल्या एका भाडेकरू कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे संबंधितांना लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची तीव्र लक्षणे दिसत असल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मृतांमधील एकाला दम्याचा त्रास होता, असेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, संबंधित रुग्णांच्या निकटच्या संपर्कात आलेल्यांना क्वारेंटाइन करण्यात आल्याचेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. पालिकेच्या जी-साऊथ विभागात ही घटना घडली आहे.



























































