
पालिकेच्या अग्निशमन दलातील 41 कर्मचारी अधिकार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज आणखी एका जवानाचा मृत्यू झाला. ते गोरेगाव अग्निशमन केंद्रात कर्तव्यावर होते. त्यामुळे अग्निशमन दलातील दोन जवान आतापर्यंत कोरोनामुळे दगावले आहेत. दरम्यान, अग्निशमन दलातील तीन जण कोरोनामुक्त झाले आहेत.
अग्निशमन दलाच्या माध्यमातून सध्या मुंबईभरात निर्जंतुकीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. मात्र यावेळी कोरोना प्रादुर्भाव असलेल्या विभागातही काम करावे लागत असल्याने काही वेळा क्लोज काँटॅक्ट आल्यामुळे जवान, कर्मचारी-अधिकार्यांना कोरोनाची लागण होत आहे. दरम्यान, मृत जवानांच्या कुटंबातील एका वारसाला नोकरी आणि पालिका, राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.




























































