
जालना जिल्हा सरकारी रुग्णालयातर्फे प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 198 संशयित रुग्णांपैकी 164 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अद्याप 25 जणांचे अहवाल प्रयोग शाळेकडे प्रलंबित असून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 123 झाली आहे.
जिल्हा रुग्णालयातर्फे प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आलेल्या 198 संशयित रुग्णांपैकी शुक्रवारी रात्री पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 122 वर पोहचली होती. शनिवारी सकाळी मंठा तालुक्यातील नानसी गावातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 123 वर पोहचली आहे.


























































