
मुंबईतील धारावी हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. परंतु गेल्या काही दिवसांत धारावीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कही होताना दिसत आहे. धारावीत शनिवारी फक्त 10 रुग्ण आढळले आहेत. तसेच 30 मे पर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.
धारावीमध्ये शनिवारी 10 रुग्ण आढळले आहेत. त्यापूर्वी 27 एप्रिल रोजी 13 रुग्ण आढळले होते. गेल्या 10 दिवसांत धारावीत एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. धारावीत पालिकेने उत्तम काम केल्याने हे शक्य झाले आहे. स्क्रीनींग टेस्ट, चांगल्या आरोग्य सुविधा आणि सॅनिटायझेशमनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.


























































