
रविवारी दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे 176 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 119 अहवाल निगेटिव्ह तर 57 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारी दुपारनंतर नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या पाच जणांना घरी सोडण्यात आले. तर उर्वरित चौघांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान शनिवारी रात्री एका 85 वर्षीय रुग्णांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या 813 झाली आहे. तर आजअखेर 236 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण 6146 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 5867, फेरतपासणीचे 111 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 168 नमुने होते. आजपर्यंत एकूण 6120 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या 5307 आहे. तर पॉझिटिव्ह अहवाल 813 आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
































































