
पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी कावलगाव शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात वाळूचा उपसा करून त्याच चोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी मिळालेल्या माहितीनुसार विशेष पथक रवाना करून छापा टाकण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे छापा टाकून 2 टेम्पो, 2 ट्रक्टर, 1 वाळू उपसा करणारी बोट आणि वाळू असा एकूण 21 लाख 78 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी एकूण 17 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये 3 वाहन चालक, 1 बोटचालक, 3 मजूर तसेच बोटचे 10 भागीदार/मालक यांनाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून 11 आरोपी फरार झाले आहेत. 15 लाख 6 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रात्री अंधार असल्याने नदी पात्रातून बोट बाहेर काढता आली नाही. त्यामुळे आवश्यक ती साधनसामग्री जमवून बोट बाहेर काढून जप्त करण्यात येणार आहे. बोटची पाईपलाईन व टाक्यांसह किंमत 6 लाख 18 हजार एवढी आहे. एकूण 21 लाख 78 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत पांचाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक हनुमान कच्छवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सखाराम टेकुळे, जगदीश रेड्डी, पोलीस कॉन्स्टेबल विजय घनसावांत, अतुल कांदे, चालक गजेंद्र चव्हाण, तसेच आर.सी. पि.चे पो.का. लक्ष्मण बोडके, मोहिज पठाण, सादिक पठाण, शेख रमिज आदींनी मिळून केली.




























































