कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही गावात प्रवेश नाकारला, दोन मुलांसह माता निराश होऊन परतली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

3 जून रोजी ठाणे येथून गेवराई तालुक्यातील मालेगाव (बु.) येथे येत असताना एका कुटुंबातील दोन जण पॉझिटिव्ह निघाले. त्यांना उपचारासाठी दाखल करून, कुटुंबातील अन्य निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींना गावात पाठवलं. मात्र त्यांना गावात घेण्यास गावकऱ्यांनी नकार दिला. यामुळे एक माता आणि तिच्या मुलांना परत फिरावं लागलं आहे.

गावाला निघालेले असताना नगर येथेच पतीला ऍडमिट करावे लागले, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर मुलीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला मुलगी बीडमध्ये उपचार घेत आहे तर वडील नगरमध्ये आहेत. त्यानंतर सर्वांचे स्वॅब घेण्यात आले, मुलीची आई व दोन भाऊ निगेटिव्ह आल्यामुळे बीड जिल्हा प्रशासनाने त्यांना आज  मंगळवार रोजी डिस्चार्ज दिला. दोन मुलांसह आपल्या गावी मालेगाव येथे गेले. गावात गेल्यानंतर गावातील काही लोकांनी गावात प्रवेश दिला नाही, सदर महिला आपल्या दोन मुलांसह गेवराई पोलीस ठाण्यात व तहसील कार्यालयात आली, ॲम्बुलन्स चालकाने ही कैफियत कोरोना काळात नियुक्त केलेले नोडल अधिकारी अभय जोशी यांच्याकडे मांडली. नायब तहसीलदार जोशी यांनी सदर प्रकरणी तलाठ्याकडे चौकशी केली. त्यानंतर सदर ॲम्बुलन्स वाहन चालकाने जिथून डिस्चार्ज मिळाला होता तेथे संपर्क केला असता त्यांनी ॲम्बुलन्स परत घेऊन या, असे आदेश दिले. यानंतर बीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत त्यांना विलगीकरण कक्षात आठ दिवस ठेवण्यात येणार असल्याचे समजते.