मुंबईत 1015 नवे कोरोना रुग्ण, 58 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या एकाच दिवसांत 1 हजार 15 नवीन कोरोनाबाधित नोंद झाले असून 58 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 50 हजार 878 झाली असून मृतांचा आकडा 1758 झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत 22 हजार 942 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 26 हजार 178 अ‍ॅक्टिव्ह केसेस असल्याचे पालिकेच्या आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले.

मुंबईत मृत झालेल्या 58 जणांमध्ये 40 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश आहे. मृतांमधील 30 जणांचे वय 60 वर्षांहून जास्त होते. तर 26 रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील आणि 2 रुग्णांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते. मुंबईत गेल्या एकाच दिवसांत 904 रुग्ण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून कंटेनमेंट झोनमध्ये प्रभावी काम केले जात आहे. मुंबईत झोपडपट्ट्या, चाळी मिळून 775 कंटेनमेंट झोन असून 4071 इमारती सील केल्या असल्याची माहितीही पालिकेकडून देण्यात आली.