
पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठ असलेल्या येथील गांधीनगर बाजारपेठेत चिनी मालाची आवक व विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या निषेधार्थ आज सायंकाळी करवीर शिवसेनेच्या वतीने चिनी मालाची होळी करण्यात आली.
संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाची पैदास चीनच्या प्रयोगशाळेतुन झाली आहे. त्याचा प्रादुर्भाव हिंदुस्थानमध्येही मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यात मोठी बाजारपेठ असलेल्या हिंदुस्थानात आपला माल विकायचा आणि हिंदुस्थानच्या विरोधातच शेजारी राष्ट्रांमध्ये विष पेरायचे अशा कूटनीतीचा चीन वर्षानुवर्षे अवलंब करत आहे. शिवाय हिंदुस्थानच्या सीमेवरही दादागिरी करण्याचे प्रमाण वाढले आहे .त्यामुळे अशा मस्तवाल चीनला आता जनतेनेच धडा शिकविण्याची गरज निर्माण झाली आहे.
अमेरिकेसह काही देश चीनशी व्यापारी संबंध तोडत आहेत. यापार्श्वभुमीवर आपल्या देशातही चीनी मालकांवर बहिष्कार टाकुन स्वदेशी मालाचा वापर करण्याचा जोरदार पुरस्कार ठिकठिकाणी होऊ लागला आहे. शिवसैनिकांनी राबविलेल्या या मोहिमेला सर्वत्र जनतेचा पाठिंबा मिळत आहे.
दरम्यान येथील गांधीनगर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चिनी मालाची आवक होत असल्याने, करवीर तालुका प्रमुख राजु यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जोरदार निषेध करुन, चिनी मालाची जाहिर होळी केली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना जिंदाबाद, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याांचा जयघोष करत, शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी अवधूत साळोखे, पोपट दांगट, शरद माळी, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, दिलीप सावंत, प्रफुल्ल घोरपडे, साताप्पा शिंगे, वीरेंद्र भोपळे, दीपक पोपटणी, दीपक अंकल, सुनील पारपाणी, किशोर कामरा, शिवाजी लोहार, बाबुराव पाटील, नितीन राणे, विनोद रोहिडा, उमेश साळोखे, शंकर चंदवानी, किरण शिंगे आदी शिवसैनिक उपस्थित होते































































