कोल्हापुरात 16 नवीन रुग्णांची नोंद, एकूण आकडा 708 वर; 601 जणांना डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने चालली असतानाच आज सकाळी आणखीन नवे बारा कोरोना पाॅझीटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोना बाधीतांची संख्या 708 झाली आहे. तर 601 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रात्री पासुन आज सकाळपर्यंत नवे 16 कोरोना रुग्ण आढळले. तर 7 जणांना डिस्जार्ज देण्यात आला.

नावली, ता. पन्हाळा येथील 33वर्षीय पोलिसाचा अहवालही‌ गुरूवारी रात्री कोरोना पाॅझीटिव्ह आल्याने जिल्ह्यातील हा पहिला कोरोनाबाधित पोलिस ठरला आहे. शिवाय आज सकाळी करवीर तालुक्यातील बीडशेड येथील गॅरेज मधील तिघेजण कोरोना पाॅझीटिव्ह आढळल्याने गावांत सामाजिक स्तरावर हा संसर्ग पसरण्याची भिती निर्माण झाली आहे.

लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा खुलासा

आज सकाळी 10 वाजेपर्यंत 132 प्राप्त अवालापैकी 117 अहवाल निगेटिव्ह तर 12 अहवाल पॉझीटिव्ह (708 पैकी यापूर्वीचे 3 अहवाल पॉझिटिव्ह आहेत असे मिळून एकूण 132) आले आहेत. तर आतापर्यंत 8 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजअखेर जिल्ह्यात एकूण 99 पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन देण्यात आली.

सकाळी प्राप्त 12 पॉझीटिव्ह अहवालात गडहिंग्लज, हातकणंगले आणि शाहुवाडी तालुक्यातील प्रत्येकी-1, पन्हाळा- 2 तर करवीर तालुक्यातील -5 आणि कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील -3 असा समावेश आहे. आजअखेर भुदरगड- 70, चंदगड- 74, गडहिंग्लज-81, गगनबावडा-6, हातकणंगले-9, कागल-57, करवीर-19, पन्हाळा-27, राधानगरी- 64, शाहुवाडी-176, शिरोळ-7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र-25 असे एकूण 700 आणि पुणे-1, सोलापूर-3, मुंबई -1, कर्नाटक-2, आंध्रप्रदेश -1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 708 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.