
गायीला जुळी वासरे होण्याची घटना अगदी क्वचितच घडते. संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव बाईंगवाडी येथील व्यापारी व उपक्रमशील शेतकरी उमेश सावंत यांचा घरी गायीने चक्क जुळ्या वासरांना जन्म दिला आहे. परिसरातील नागरिकांनी हे आशचर्य पाहण्यासाठी गर्दी केली.
दोन्ही वासरे व गाय सुखुरुप आहेत. या परसिरतील ही पहिलीच घटना असल्यामुळे सावंत कुटुंबीय खुश आहेत. दोन्ही वासरे काळ्या पांढऱ्या रंगाची आणि गोंडस असून त्यांची शरीरयष्टी देखील सुदृढ असल्याचे पशुधन अधिकाऱ्यांनी सांगितले .

























































