
मुंबईत रुग्णवाढ कायम असून गेल्या एकाच दिवसांत 1395 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 79 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या एकाच दिवसांत 1 हजार 39 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या 26 हजार 986 वर पोहोचली आहे.
मुंबईत हजारो रुग्ण कोरोनामुक्त होत असल्यामुळे सध्या 28 हजार 959 अॅक्टिव्ह केसेस असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली. दरम्यान, गेल्या एकाच दिवसांत मृत झालेल्या 79 जणांमध्ये 55 पुरुष आणि 24 महिलांचा समावेश आहे. मृतांमधील 42 जणांचे वय 60 वर्षांहून अधिक, 33 रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील आणि 4 जणांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते.






























































