धक्कादायक! एका दिवसातील कोरोनाच्या बळींचा आकडा पाच पटीने वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 24 तासात कोरोनाग्रस्तांचा बळींचा आकडा दररोजच्या आकड्यापेक्षा पाच पटीने वाढला आहे. दररोज तीनशे ते चारशेच्या आकड्यात वाढणारी बळींची संख्या मंगळवारी थेट दोन हजारावर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासात 2003 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली ही आकडेवारी धक्कादायक आहे.

गेल्या 24 तासात देशात 10,974 कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. देशात सध्या 3,54,065 कोरोनाग्रस्त असून त्यातील 1,55,227 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 1,86,935 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण बळींची संख्या ही 11903 वर पोहोचली आहे.