चीनच्या हल्ल्याचा चंद्रपुरात शिवसेनेकडून तीव्र निषेध; चिनी वस्तूंची केली होळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या सीमेवर चीनी सैनिकांनी घुसखोरी करून आपल्या हिंदुस्थानी जवानांवर हल्ला केला. त्यात 20 जवान शहीद झाले. देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना शिवसेने तर्फे आज आदरांजली वाहण्यात आली.

शिवसेनेचे नगरसेवक सुरेश पचारे यांच्या नेतृत्वात चीनच्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत मोबाईल, टीव्ही, इलेक्ट्रिक लायटिंग आदी चिनी वस्तूंची होळी करण्यात आली व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा फोटो व ध्वज जाळत निषेध व्यक्त करण्यात आला. चीनविरोधी घोषणाना देत चीनी वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन शिवसेनेचे नगरसेवक सुरेश पचारे यांनी केले. यावेळी सचिन बोरसरे, सुजित पेंदोर, संघर्ष आत्राम, भूषण देवगडे, सौरभ उसगावकर, कुणाल काळे, श्रीकांत बडे, यशवंत मत्ते, रुद्रा उरकुडे, मेघा घोटेकर, नंदिनी कुत्तरमारे, बाळू नैताम सह यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.