
सहकारनगरमध्ये एका चप्पल व्यवसायिक तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, शहरात आज सकाळी दाम्पत्याने गळफास घेतल्यामुळे आत्महत्याच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.
शुभम राजेंद्र बोबडे (वय 23, रा. नवजीवन सोसायटी, सहकारनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम बोबडे हे चप्पल व्यवसायिक होते. त्यांचे तुळशीबाग येथे दुकान होते. शुभम काल दुपारी आत्याकडे गेला होता. त्यावेळी त्याने गळफास लावून आत्महत्या केली. आत्याने हा प्रकार पाहिल्यानंतर ही घटना समोर आले. त्यावेळी पोलिसांना माहिती देण्यात आली. सहकारनगर पोलिसांनी धाव घेतली. शुभम याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. तसेच सुसाईड नोट ठेवलेली नाही. पोलिसांकडून आत्महत्येचे कारण शोधले जात आहे. अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.





























































