ऑनलाईन अभ्यासामुळे मुलांचे डोळे खराब होतात, गुजरात हाय कोर्टाने सरकारकडे मागितले उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाईन अभ्यासामुळे मुलांचे डोळे खराब होता. त्यामुळे या प्रकरणी काय उपाययोजना करता येतील असे आदेश गुजरात हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.
अनलॉक 1 मध्ये शाळा महाविद्यालय सुरू करण्याची परवागनी दिलेली नाही. तरी खासगी शाळा ऑनलाईन अभ्यास सुरू करून फीस वसूल करत आहेत. या विरोधात गुजरात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. फीसबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सरकारकडे असल्याचे कोर्टाने म्हटले. पालकांवर फार ताण येता कामा नये यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे, शाळेच्या संचालकांसोबत चर्चा करून तोडगा काढला पाहिजे असेही कोर्टाने म्हटले.