
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांची संख्या 18 वर पोहोचली आहे. यात सीआयएसएफ, केंद्रीय राखीण पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस आणि सशस्त्र सीमा दलाच्या जवानांचा समावेश आहे.
कोरोनामुळे आज दिल्लीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा जवान कॉन्स्टेबल जितेंद्रर कुमार (41) याचा आज मृत्यू झाला. ताप आणि श्वसनाला त्रास होऊ लागल्यानंतर त्याला दिल्लीच्या ‘आरएमएल’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱया सीआयएसएफच्या जवानांची संख्या सहा झाली आहे.




























































