
धाराशिव जिल्ह्यात आज 4 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून कोरोना रुग्णांचा आकडा 183 झाला आहे. यातील 136 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून उर्वरित 40 पेशंटवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज एक कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
धाराशिव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून 42 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले असून यातील 36 स्वॅब निगेटिव्ह, 4 स्वॅब पॉझिटिव्ह तर दोन स्वॅब हे अनिर्णीत आले आहेत. या पॉझिटीव्ह रुग्णापैकी एक रुग्ण हा तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील असून तो पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. दोन पेशंट हे भूम तालुक्यातील असून इडा येथील एक तर नाळीवडगाव येथील एक पेशंट आहे. तो मुंबई रिटर्न आहे. चौथा पेशंट लोहारा तालुक्यातील फनेपुर येथील असून तोही पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे.
























































