
भाजपमधील अंतर्गत नाराजी, गटातटाचे राजकारण व कोरोनाच्या संकटामुळे भाजपमधील संघटनात्मक नियुक्त्या मागील काही महिन्यांपासून रखडल्या आहेत. पण आता पक्षातील वाढत्या नाराजीचा विस्फोट होण्यापूर्वी आता जुलै महिन्यात भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेब्रुवारी महिन्यात फेरनिवड झाली झाली. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन टीम जाहीर होण्याची शक्यता होती. पण मार्चमध्ये महाराष्ट्रापासून संपूर्ण देशात कोरोनाचे संकट आले. त्यामुळे अपेक्षित संघटनात्मक फेरबदल होऊ शकले नाहीत. मात्र जुलै महिन्यात भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होण्याचे संकेत आहेत.
नाराजांचे पुनर्वसन
भाजपमध्ये सध्या नाराजांची संख्या मोठी आहे. त्यात प्रामुख्याने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. विधान परिषदेवर वर्णी न लागल्यामुळे हे दोन्ही नेते नाराज आहे. या दोघांच्याबाबत केंद्रीय पातळीवर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. कोथरुडची जागा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडावी लागलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर देखील संघटनेमध्ये मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे सांगण्यात येते


























































