बुलढाणा- 19 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 01 पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 20 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 19 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.

प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हा मोमीनपुरा, मलकापूर येथील 55 वर्षीय महिलेचा आहे. सदर महिलेचा आज 23 जुन रोजी मृत्यू झाला आहे. तसेच काल 22 जुन रोजी कोरोनाबाधीत काळीपूरा, मलकापूर येथील 70 वर्षीय महिला उपचारादरम्यान रूग्णालयात मरण पावली. तसेच आतापर्यंत 2273 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 166 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी 10 मृत आहे. आतापर्यंत 122 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 122 आहे. सध्या रूग्णालयात 34 कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच आज 23 जुन रोजी 20 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 01 पॉझीटीव्ह, तर 19 निगेटीव्ह आहेत. आज रोजी 44 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2273 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.