
कोरोना महामारी दरम्यान रक्ताची कमतरता भासू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने शहरातील रामनगर सिंधी पंचायत भवनात रक्तदान शिबिराचे जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांनी आयोजन केले होतं. यावेळी रक्तदान शिबिरात आरोग्य सेविकांचा शिवसेने कडून सत्कार करण्यात आला.
रक्तदान शिबिरात शिवसैनिकासह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. शिवसेनेतर्फे आज जिल्ह्यातून 400 बाटल्या रक्तदान करण्यात आलं. यामध्ये युवकासह महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मनस्वी गिर्हे यांची उपस्थिती होती. यावेळी यांनी युवा मुला मुलींना रक्तदान करा आवाहन केलं. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, शहरप्रमुख प्रमोद पाटील, युवासेना जिल्हा समनव्यक निलेश बेलखेडे, शहरप्रमुख अक्षय अंबिरवार, राहुल विरुटकर, सोनू ठाकूर शिवसेना तालुकाप्रमुख संतोष नरुले, मनस्वी गिर्हे, विद्या ठाकरे, संगीता लांजेवार, सौ. बुरडकर , रासपायले, सायली गिऱ्हे, प्रतीक्षा खांडरे, अल्का बोरगमवारसह शिवसैनिकांनी उपस्थिती होती.


























































