
>> प्रेमानंद गज्वी
सध्या हातात वेळ भरपूर आहे, पण आजूबाजूचे वातावरण किंवा मानसिकता अशी आहे की काही फारसं लिहून होताना दिसत नाही. लॉकडाऊनच्या दिवसांत काही राहिलेली कामं नक्कीच पूर्ण केली. अजय कांडर यांच्या ’युगानुयुगे तूच’ या पुस्तकाची समीक्षा लिहिली. हिंदुस्थानचा आद्य नाटककार अश्वघोष यांच्या जीवनावर विरेंद्र गणवीर यांनी नाटक लिहिलंय. त्याला प्रस्तावना लिहायची होती. ते काम बरेच दिवस राहिलं होतं. ते पूर्ण केलं. आणखी एका गौरवग्रंथासाठी लेखन केलं. असं काही ना काही सुरू आहे. स्वतःचं नाटक लिहायचा विचार सुरू आहे. ’वडापाव’ असं त्याचं नाव आहे. त्याची जुळवाजुळव सुरू आहे.
अलीकडच्या दिवसांत मी बघितलं की बरेच लोक फेसबुकवर त्यांचे साहित्य घेऊन आलेत. कुणी कथा काचून दाखवतंय, कुणी नव्या जुन्या कविता सादर वरतंय. फेसबुक हे लोकांनी मनोरंजनाचे माध्यम हुडकून काढलेय. पण तिथे फार तर काही ‘लाईक’ मिळतात. त्यापेक्षा मोठी चर्चा होत नाही. मोठा परिणाम साधला जात नाही. मोठे साहित्यिकही आपले साहित्य सोशल मीडियावर वाचायला तयार नाहीत. पण असे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत.
कोरोनानंतरचं साहित्य कसं असेल, असं मला विचारलं जात. त्यावर मी सांगेन की, सध्या साहित्याबद्दल विचार करावा की करू नये अशी परिस्थिती आहे. आपल्याकडे साठोत्तरी साहित्य आले होते. नंतर नवकथा, नवककितेचा प्रवास झाला. त्यानंतर नव्वदोत्तरी साहित्य आलो. 90 च्या नंतर जे ग्लोबलायजेशन झालं, त्याचा साहित्य प्रवाह निर्माण झाला. पण तो लगेच आला नाही, त्यासाठी काही कालखंड जावा लागला. त्याचप्रमाणे कोरोनोत्तरी साहित्य उभं राहायला वेळ द्यावा लागेल. ते आधी लेखकामध्ये झिरपावं लागेल. झिरपल्यानंतर कल्पकतेने काही गोष्टी सिद्ध होतील. उदाहरणार्थ, सामाजिक अंगाने किंवा झोपडपट्ट्यांचे प्रश्न आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवा असं सांगितलं जातंय. पण झोपडपट्टीमध्ये ते अशक्य आहे. याचं नेमकेपणाने वर्णन करावं लागेल. व्यक्ती वा समाजावर झालेले परिणाम वर्णन करायचे तर एक कालखंड थांबून नीट विचार करावा लगाले. काळाशी सुसंगत साहित्य निर्माण करावं लागेल.
कडक नियम हवेत
खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल घेणे, स्वच्छता राखणे, रस्त्यात थुंकू नये, या गोष्टी शालेय जीवनापासून शिकवल्या जातात. आपल्याकडे लोक सर्रास पान खाऊन रस्त्यात पचापचा थुंकतात. या सवयी बदलण्यासाठी कडक कायदे केले पाहिजेत. यापुढे समाजजीवनात कसं कागावं याचे नियम आपल्याला खूप कठोर करावे लागतील. हे कोरोनाने आपल्याला शिकवलंय. यातून जर लोक धडाच घेणार नसतील तर त्याला कोण काय करेल!
विज्ञाननिष्ठ होणं काळाची गरज
कोरोनाचा संकटाचा काळ आपल्याला खूप काही शिकवतोय, धडे देतोय. जोपर्यंत प्रत्यक्ष लस निर्मिती होत नाही आणि प्रत्येकाला लस टोचली जात नाही तोपर्यंत संकट कायम आहे. हा काळ अप्रत्यक्षरीत्या विज्ञाननिष्ठ होणं शिकवून गेलाय. इथून पुढे विज्ञाननिष्ठ माणसं होतील, लोक विज्ञानाकडे कळतील अशी आशा करूया. आपल्याकडे अंधश्रद्धेच्या अंगाने विज्ञानाचा पराभव करतात आणि ज्या देशांमध्ये विज्ञानाचा पराभव होतो, ते देश जगाच्या तुलनेने मागेच रहातात.
(लेखक नाटककार–कवी आणि 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष आहेत)लॉकडाऊनच्या दिवसांत काही राहिलेली कामं नक्कीच पूर्ण केली. अजय कांडर यांच्या ’युगानुयुगे तूच’ या पुस्तकाची समीक्षा लिहिली.




























































