मुंबईत शुक्रवार, शनिवार मुसळधार पावसाचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणासह मुंबईत शुक्रवार आणि शनिवारी ( 3 आणि 4 जुलैला) मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या आधीही मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेनेही हवामान विभागाचा हवाला देत मुंबईत दोन दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली असून गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन मुंबईकरांना केले आहे.