लेख – गलवान प्रकरणाचा धडा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

युद्धकालीन माहितीच्या धुरळय़ात खूपशी अवास्तव माहिती उडत राहते. माहिती नसलेले आणि स्वयंशैली संरक्षण तज्ञ असत्य वक्तव्ये प्रसृत करतात. हिंदुस्थानी व चिनी सैनिकांत पूर्व लडाखमधे 15 व 16 जून 2020 रोजी झालेल्या लढाईबाबतही असेच झाले. हिंदुस्थानी सैनिकांसोबत छेड काढू नये हा धडा चिन्यांनी घेतला आहे.

चीनला असे वाटते की, गलवान खोरे वापरून हिंदुस्थान अक्साई चीनच्या बाजूला आक्रमण करेल. त्यामुळे चीनला हिंदुस्थानच्या आत घुसायचे होते, ज्यामुळे महत्त्वाच्या रस्त्यावर लक्ष ठेवता येइल.चीनने अक्साई चीनपासून गलवान खोऱयापर्यंत रस्ताही बांधलेला आहे.

गलवान नदीच्या खोऱयात 1962 साली सुद्धा युद्ध झाले होते. पी.पी.-14 हा हिंदुस्थानच्या ताब्यातील गलवान खोऱयाच्या तोंडातील केवळ एक बिंदू आहे. चीनच्या बाजूने गलवान व शायॉक नद्यांच्या संगम आणि त्यापलीकडचा रस्ता झाकला जातो. हिंदुस्थानने अलीकडेच इथे एक पूल बांधला आहे. या पुलापासून पी.पी.-14 बिंदूपर्यंत, दारबुक-शायॉक-दौलत बेग ओल्डी मार्गावर रस्ता बांधलेला आहे. इथली चीनसोबतची प्रत्यक्ष-नियंत्रण-रेषा (लाइन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल) जमिनीवर आखलेली नाही. गलवान खोरे या रेषेच्या पूर्वेला आहे. गेल्या 58 वर्षांपासून ते चीनच्याच ताब्यात आहे.

हिंदुस्थानने दारबूक-शायॉक-दौलत बेग ओल्डी रस्ता बांधलेला आहे. हा 255 किलोमीटर लांब आहे. रसद पुरवठय़ाच्या दृष्टीने व्यूहरचनात्मक, तसेच सैन्याच्या बदलांकरताही महत्त्वाचा आहे. या रस्त्यामुळे उत्तम निगराणीही करता येते. चीनला उत्तम आक्रमक प्रतिसादही दिला जाऊ शकतो.

सीमा व्यवस्थापनावर 1993, 1996 आणि 2013 साली झालेल्या तीन करारान्वये अंगारधारी शस्त्र्ाs सीमेवर वापरण्यास मनाई आहे. मात्र लढाईतच अधिक प्राणहानी होत आहे. हा प्रसंग चीनने पी.पी.-14 बिंदूपर्यंत येण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे उद्भवला. 10 ते 12 जून 2020 दरम्यान त्यांनी या बिंदूच्या खालीच एक तंबूंचे शिबीर उभारले. हे शिबीर हिंदुस्थानने बळाचा वापर करून 12 व 13 जून 2020 ला हटवले. पीपल्स लिबरेशन आर्मी चिनी सैन्यास या कारवाईत जीवितहानीही सोसावी लागली. 14 जून 2020 रोजी त्यांनी तंबूंचे नवे शिबीर उभे केले. हिंदुस्थानला 15 जून 2020 रोजी नवीन तंबू आणि जास्त चिनी सैंनिकांची उपस्थिती याचा शोध लागला आणि याचे पर्यवसान लढाईत झाले. 6 जून 2020 रोजी वर्तमान स्थितीतून माघार घेण्याबाबत, हिंदुस्थानच्या 14 व्या कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल हरिंदरसिंग आणि चीनच्या दक्षिण झिंझिआंग क्षेत्राचे मेजर जनरल लियू लिन यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार 15 जून 2020 पर्यंत हिंदुस्थानने पश्चिमेकडे 1.5 किलोमीटरपर्यंत आणि चीनने पूर्वेकडे 2.5 किलोमीटरपर्यंत माघार घेणे अपेक्षित होते.

16-बिहारमधील मेजर हुद्दय़ाच्या अधिकाऱयाचे नेतृत्वात 10 सैनिकांच्या एका पथकास या वस्तुस्थितीची पडताळणी करण्यास पाठवण्यात आले होते. त्यांना तंबू आढळून आले. त्यांनी ते जाळून टाकले. ते परतत असताना त्यांना सशस्त्र्ा चिनी सैनिकांनी घेरून ताब्यात घेतले.

16-बिहारचे अधिकारी कर्नल संतोष बाबू यांना हे समजताच त्यांनी चिनी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी 30 सैनिकांसह घटनास्थळी धाव घेतली. चिनी सैनिक उंचावर होते. हिंदुस्थानी सैनिक सावकाश चढत होते. 16,000 फुटांवर चाल अत्यंत मंदपणे व संथच होत असते. कित्येकदा श्वासच कुंठीत होतो. शिवाय रस्ता एवढा अरुंद होता की, एका ओळीतच एकापाठी एक चालावे लागत होते. याकरताच तर पी.पी.-14 पर्यंत पायवाट बांधण्यात आली होती. कर्नल संतोष बाबू यांचे पथक चिनी तंबूंपासून 60 ते 100 मीटर अंतरावर असतानाच चिनी सैनिकांनी त्यांना एकटय़ालाच समोर येण्यास सांगितले. कर्नल संतोष दोन सैनिकांसह पुढे सरकले. ध्वजभेटींकरताच्या शिरस्त्यानुरूपच तिघेही निःशस्त्र्ा होते. अचानक कर्नल बाबू आणि इतर सैनिकांवर चिन्यांनी मोठमोठय़ा दगडांनी मारा सुरू केला. चिनी सैनिकांनी खिळे लावलेल्या काठय़ांनी त्यांच्यावर हल्ला केला. तिघेही जबर जखमी झाले. उर्वरित सैनिकांनी ही घटना तळास कळवली आणि चिन्यांवर हल्ला चढवला. समोरासमोर लढाई सुरू झाली. चिनी खिळय़ांच्या गदांना प्रत्युत्तर देण्याकरता हिंदुस्थानींकडे रायफलवर चढवलेली बायोनेटस् होती. अशा प्रकारच्या समोरासमोर लढाईसाठी हिंदुस्थानी सैनिक उत्तमरीत्या प्रशिक्षित आहेत.

दरम्यान, चिन्यांना 400 सैनिकांची कुमक प्राप्त झाली. मल्लयुद्ध आणि काटेरी तारा लावलेल्या रॉड्सनी चिनी सैनिकांनी हल्ला केला होता. आपल्याही सैनिकांना 16-बिहार व 200 सैनिक येऊन मिळाले. हे सैनिक 16-बिहार, 3-पंजाब, 4-महार आणि 181-फिल्ड रेजिमेंटचे होते. हिंदुस्थानी सैनिक संतप्त झालेले होते. 16-बिहारच्या कमांडिंग अधिकाऱयांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी त्यांनी चिन्यांवर आक्रमण केले. इतर बटालियन्सचे ’घातक प्लॅटून्स’ही येऊन मिळाले. चिन्यांच्या किमान 18 सैनिकांना कंठस्नान घातले.

युनिटचा कमांडिंग ऑफिसर हा वडिलांच्या जागी असतो असे लष्करातील सैनिक मानतात. कमांडिंग ऑफिसरला मारहाण करणे किंवा त्याचा अनादर करणे म्हणजे आपल्या पालकांचा अपमान केल्यासारखे आहे. त्यामुळे हिंदुस्थानी सैनिकांनी ताबडतोब याचे उत्तर म्हणून चिन्यांवर हात उचलला. आणि त्यांच्यात कोणत्याही शस्त्र्ााशिवाय घमासान लढाई सुरू झाली. दोन्ही बाजूंचे सैनिक जखमी झाले. पण यात हिंदुस्थानींची सरशी झाली. 16-बिहारचे संतप्त सैनिक चिनी सैनिकांचे प्राणच हिरावू लागले. चिनी सैनिकांच्या बुलडोझरमुळे या भागदौडीतच एक भूस्खलन घडून आले. अनेक चिनी सैनिक शेकडो फूट खोल, बर्फासारख्या थंडगार गलवान नदीच्या खाईत पडले आणि बहुधा प्राणास मुकले.

16-बिहारचे लेफ्टनंट कर्नल, कॅप्टन (3 वर्षे सेवा), कॅप्टन (2 वर्षे सेवा) सर्वात धाडसी होते. त्यांनी सैनिकांना कमांडिंग अधिकाऱयांच्या मृत्यूचा सूड घेण्याकरता भयंकर आवेशाने पुढे नेले. आर्टी. रेजिमेंटच्या एका शिपायाने 10 चिनी सैनिकांना आपल्या तलवारीने यमसदनास पाठवले. चिनी सैनिकांकडूनच हिसकावून घेतलेल्या तलवारींनीच त्यांनी त्यांची कत्तल केली.

हिंदुस्थानने कर्नल संतोष बाबू यांच्यासहित 20 सैनिक गमावल्याचे घोषित केले. चीननेही जबर प्राणहानी सोसली. हिंदुस्थानी अनुमानानुसार ही संख्या 43 होती. हे अनुमान पार्थिवे गोळा करण्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टरच्या खेपांवरून काढण्यात आलेले आहे. अमेरिकन अहवालांनुसार 35 चिनी मृत झाले असावेत असे दिसते. त्यात कर्नल्स आणि मेजर्स यांचाही समावेश आहे. यात भूस्खलनात दरीत पडून दगावलेल्या सैनिकांचा समावेश नाही. चिन्यांनी गलवान प्रकरणाचा हिंदुस्थानी सैनिकांसोबत छेड काढू नये हा एक धडा शिकला आहे.