कोरोनाचा फटका; 12 टक्के उद्योगांचे शटर डाऊन, देशातील 70 टक्के ‘स्टार्ट अप’ला घरघर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टार्टअप आणि सक्षम, लघु व मध्यम उद्योगाला (एमएसएमई) प्रोत्साहन देवून आत्मनिर्भर हिंदुस्थान बनण्यासाठी पाऊल उचलत असल्याचे पेंद्र सरकार सांगत असले तरी कोरोना लॉकडाऊनने उद्योजकांना मोठा फटका बसला आहे. देशातील तब्बल 70 टक्के स्टार्टअपची आर्थिकस्थिती गंभीर असून घरघर लागली आहे. 12 टक्के स्टार्टअपचे शटरडाऊन झाले आहे. अनेक ठिकाणी पगार कपात होत असून नोकरीवरही पुऱहाड कोसळत आहे.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री अर्थात फिक्की आणि इंडियन एंजेल नेटवर्प यांनी केलेल्या सर्वेक्षणात स्टार्टअपच्या गंभीर स्थितीची माहिती पुढे आली आहे. केवळ 16 टक्के स्टार्टअपची चांगली स्थिती आहे. तर 14 टक्के स्टार्टअपच्या व्यवसायावर परिणाम झालेला नाही, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

  • 43 टक्के स्टार्टअपने एप्रिल ते जून या तीन महिन्यांत कर्मचाऱयांच्या वेतनात 20 ते 40 टक्क्यांनी कपात केली.
  • 23 टक्के स्टार्टअपमध्ये 41 ते 60 टक्के पगार कपात झाली.
  • लॉकडाऊनचा परिणाम असाच राहिला तर 30 टक्के पंपन्यांमध्ये कर्मचारी कपात होऊ शकते.
  • 92 टक्के गुंतवणुकदारांनी पुढील तीन ते सहा महिने स्टार्टअपमध्ये कमी गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले आहे.
  • 35 टक्के गुंतवणुकदारांचा कल हेल्थ केअर स्टार्टअपकडे राहणार आहे.