भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी माथेफिरूंचा धुडगूस, अवघ्या महाराष्ट्रात संताप!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या दादर पूर्व येथील ‘राजगृहा’त घुसून काही अज्ञात माथेफिरूंनी तोडफोड केली. या घटनबद्दल महाराष्ट्रात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत राजगृहाचा अवमान करणाऱयांची सरकार गय करणार नाही, असे स्पष्ट करत कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तर आता ‘राजगृहा’ला कायमस्वरुपी पोलीस संरक्षण मिळेल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

मुंबईतील दादर भागात असलेल्या राजगृहवर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीक्ही कॅमेरा तसेच कुंडय़ांचेही मोठे नुकसान झाले आहे. घराच्या काचांकरही दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे. आंबेडकर कुटुंबीयांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी, मंत्र्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राजगृहाबाहेर आंबेडकरी अनुयायांनी गर्दी करू नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजगृहाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच राजगृह परिसरात येणाऱया नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नका – उपमुख्यमंत्री
‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱया समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, शांतता, संयम पाळाका, एकजूट कायम ठेवावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

दोषींवर कठोर कारवाई करणार – गृहमंत्री
‘राजगृह’ या डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी जो हल्ला केला तो निषेधार्ह आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरू असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

राजगृह येथील कृत्याचा राष्ट्रवादीकडून निषेध – जयंत पाटील
परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान असणारे राजगृह अनेकांचे प्रेरणास्थान आहे, नागरिकांच्या भावना राजगृहाशी जोडलेल्या आहेत. या कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

हल्ल्याची सीआयडी चौकशी करा – आठवले
राजगृह हे जगभरातील आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणा व ऊर्जास्थान आहे. ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण आणि पवित्र असणाऱया या वास्तूवरील हल्ल्याचा हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे. यामागे कुणाचा हात आहे हे शोधण्यासाठी सीआयडीद्वारे सखोल चौकशी कराकी, अशी मागणी रिपाइं अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

आरोपींना तात्काळ अटक करा – फडणवीस
भारतरत्न महामानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ याकर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्ह असून आरोपींना तात्काळ अटक क्हाकी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राजगृहाकर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध ः जितेंद्र आव्हाड
राजगृह हे डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान आहे. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असून गृहमंत्र्यांना विनंती की सखोल चौकशी होऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

राजगृहाला 24 तास संरक्षण
राजगृहाला यापुढे 24 तास पोलीस संरक्षण दिले जाईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. भायखळय़ातील शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी देशमुख यांची भेट घेतली आणि तोडफोड करणाऱया माथेफिरूंना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागाणी केली. यावेळी बाबासाहेबांचे नातू भिमराव आंबेडकर उपस्थित होते. आमदार जाधव यांनी गृहमंत्र्यांना निवेदन दिले असून राजगृहाची नासधूस हा मोठय़ा कटाचा भाग असल्याची शंका व्यक्त केली आहे

राजगृहाचा अवमान करणाऱयांची सरकार गय करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा
‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ महाराष्ट्रातील तमाम जनतेचे तीर्थक्षेत्रच आहे. या राजगृहाचा अवमान करणाऱयांची सरकार गय करणार नाही,’अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजकंटकांना इशारा दिला आहे. ‘राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला, हे धक्कादायक आहे. राजगृहाचा अवमान करणाऱयांची सरकार गय करणार नाही. याबाबत पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

राजगृह… एक श्रद्धास्थान!
‘राजगृह’ हे दादर येथील हिंदू कॉलनीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. तीन मजल्यांची ही ऐतिहासिक वास्तू म्हणजे आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान आहे. आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाणदिनी लाखो अनुयायी ‘राजगृह’ला भेट देऊन तेथे नतमस्तक होतात. 2013मध्ये या वास्तूला ‘हेरिटेज वास्तू’ म्हणून घोषित करण्यात आले. 1930मध्ये परळ विभागात डॉ. आंबेडकर यांचे कार्यालय होते. तेथे पुस्तकांसाठी जागा अपुरी पडू लागल्याने त्यांनी पुस्तकांसाठी खास घर बांधायचा विचार केला. त्यासाठी हिंदू कॉलनीमध्ये त्यांनी दोन भूखंड खरेदी केले. बँकेकडून कर्ज काढून त्यांनी तेथे बांधकाम सुरू केले. दोन कर्षांत तेथे ‘राजगृह’ आणि ‘चारमिनार’ या दोन इमारती उभ्या राहिल्या. त्यांतील ‘चारमिनार’ त्यांनी ग्रंथखरेदी आणि कर्जफेडीसाठी 1941मध्ये विकली. ‘राजगृह’मध्ये डॉ. आंबेडकर हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत राहत होते. तेथेच त्यांचे ग्रंथालय आणि कार्यालयही होते.

सर्वांनी शांतता राखा
वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करीत सर्वांना शांतता राखण्याचे आकाहन केले आहे. ‘पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातले. पोलिसांनी त्यांचे काम चोख केले. जनतेने शांतता राखाकी आणि राजगृहाच्या आजूबाजूला जमू नये,’ असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.