
मे महिन्यात होणाऱ्या चार्टर्ड अकाऊंटंटच्या (सीए) परीक्षा कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या येत्या 29 जुलै ते 16 ऑगस्ट यादरम्यान घेण्यात येणार आहेत. दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट ऑफ इंडिया (आयसीएआय) या संस्थेने ही माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली. आयसीएआयच्या वकिलांनी न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही माहिती दिली. व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली. यंदाच्या मे महिन्यातील परीक्षा नोव्हेंबर 2020 च्या परीक्षांमध्येच समाविष्ट करण्यात आल्या असल्याची माहिती वकिलांनी दिली. मे महिन्यातील परीक्षा नोव्हेंबरच्या परीक्षांमध्येच समाविष्ट करण्याच्या निर्णयाविरुध्द याचिका दाखल झाली होती. त्याकरच ही सुनावणी घेण्यात आली होती. देशभरात सीए परीक्षांची केंद्रे वाढवण्यात यावीत अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली होती.
























































