
मुंबईत शनिवारी कोरोनाचे 1,199 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 65 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1,152 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 70 हजार 492 वर पोहोचली आहे.
मुंबईत 65 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 647 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्क्यांवर आले असून मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 24 हजार 39 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 4 लाख 27 हजार 378 चाचण्या झाल्या आहेत.



























































