सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 22 जुलै रोजी रात्री 10 वाजेनंतर ते 30 जुलै रात्री 10 वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. सांगली जिल्ह्यातील महापालिका, नगर पालिका आणि नगर पंचायत भागात लॉकडाऊन असणार आहे. क़ोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आठ दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. जिल्हा्धिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.




























































