तिसऱ्या महायुद्धाचे ढग गडद, अमेरिकेचा चीनला 72 तासात दूतावास बंद करून चालते होण्याचा आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि चीनमध्ये तणाव अत्यंत शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने चिनी दूतावासाला 72 तासात कार्यालय बंद करून आपल्या देशात चालते होण्याचा आदेश दिल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. यामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग आणखी गडत झाले आहे. दरम्यान, अमेरिकेने तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयावर चीनने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, ह्यूस्टन येथील चिनी दूतावासात अंधारामध्ये काही कागदपत्रे जाळण्यात येत असल्याचे समोर आले. स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी इमारतीत जाऊन पाहणी करण्याचे ठरवले, मात्र त्यांना आत घुसू देण्यात आले नाही. ह्यूस्टन पोलिसांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.

याच दरम्यान, अमेरिकेने ह्यूस्टन येथील चिनी दूतावास बंद करण्याचे आदेश दिले आणि 72 तासात चालते होण्यास सांगितले. बुधवारी चीनने याबाबत माहिती दिली. अमेरिकेचे हे पाऊल अत्यंत चुकीचे असून यामुळे दोन्ही देशांच्या कुटनीतीक संबंधावर याचे परिणाम होतील असा अशा देण्यात आला.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रवक्ते वांग वेन्बिन याबाबत बोलताना म्हणाले की, ह्यूस्टन येथील दूतावास बंद करावे लागणारा आहे. आम्ही अमेरिकेला हा चुकीचा निर्णय मागे घेण्यास सांगितले आहे. असे न झाल्यास ची याविरोधात आवश्यक आणि योग्य पाऊल उचलेल असा इशारा त्यांनी दिला. तसेच हा निर्णय आंतरराष्ट्रीय कायदा आणि द्विपक्षीय संबंध याच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.

अमेरिकेचा चीनला घेरण्याचा प्लॅन
दरम्यान, कोरोना विषाणू जगभरात पसरल्यापासून अमेरिका चीन विरोधात भूमिका घेत आहे. तसेच दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या विस्तारवादी भूमिकेला अमेरिकेने थेट विरोध केला असून या भागात आपल्या 2 विमानवाहू युद्धनौका तैनात केल्या आहेत. तसेच तैवानला हत्यार देण्यावरूनही अमेरिका-चीन आमनेसामने आले आहेत.