
मुंबईत आज कोरोनाचे 1257 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 55 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1984 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 77 हजार 102 वर पोहोचली आहे.
मुंबईत 55 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 927 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72 टक्क्यांवर आले असून मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 22 हजार 800 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 4 लाख 56 हजार 511 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 5 हजार 829 वर पोहोचली आहे.



























































