अयोध्येतील राममंदिर; शिवसेनेकडून 1 कोटीची देणगी ट्रस्टकडे सुपूर्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी शिवसेनेकडून 1 कोटीची देणगी जाहीर करण्यात आली होती. शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी (27 जुलै) ही 1 कोटीची देणगी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आली.

अयोध्येतील रामजन्मभूमीचा वाद सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर संपुष्टात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा अयोध्येचा दौरा केला होता आणि त्यानंतर राममंदिरासाठी 1 कोटीची देणगीही जाहीर केली होती.

सोमवारी ही देणगी राममंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या खात्यात आरटीजीएसमार्फत जमा करण्यात आल्याची माहिती शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिली. अयोध्येतील राममंदिराचे भूमीपूजन व शीलान्यास 5 ऑगस्ट रोजी होणार आहे.