प्लाझ्मा दात्यांचा मुंबई महानगरपालिकेत सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियाना’त सहभागी झालेल्या दात्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. खासदार शेवाळे आणि पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या हस्ते 9 दात्यांना सन्मानपत्र देऊन पालिका मुख्यालयात गौरवण्यात आले. यात शाखाप्रमुख सतीश कटके यांचाही समावेश आहे. यावेळी जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, नगरसेवक वसंत नकाशे, धारावी विधानसभा समन्वयक विठ्ठल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.