
>> डॉ. दीपक सावंत
आजही आपण व जग कोविडशी लढताना ‘ट्रायल एरर’ या मेथडचा वापर करत आहोत, पण ज्याप्रमाणे एबोला सार्स एमईआरएस या रोगाच्या साथीतून, त्यातील अनुभवातून, त्यात झालेल्या मृत्यूच्या दहशतीतून काही देश शिकले आणि त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून लिमिटेड रिसोर्स, लिमिटेड इकॉनॉमिकल परिस्थिती असताना रुग्णसंख्या, मृत्युदर आटोक्यात ठेवला. त्यासाठी शासनाने विशेष मिशन ‘मिशन झीरो डेथ’ राबवावे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मिशन आता राज्याचा मृत्युदर कमी करणे आहे. कोणत्याही साथीच्या रोगात, अगदी प्लेगपासून ते कॉलरा, स्पॅनिश फ्लू, मिसेल्स, सार्स, स्वाईन फ्लू, एबोला एमईआरएस या सर्वात रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या यांचा बारकाईने अभ्यास केला तर कोरोना मृत्युदर हा आटोक्यात येऊ शकतो. कारण सिंगापूर, व्हिएतनाम, हाँगकाँग, न्यूझीलंडसारख्या छोटय़ा देशांनी आपली रुग्णसंख्या, मृत्युसंख्या ही आटोक्यात ठेवली.
आजची हिंदुस्थानची, महाराष्ट्राची कोरोना रुग्णसंख्या नक्की जास्त आहे. अर्थात मृत्यू आणि उपचार आणि सुरुवातीची लक्षणे तसेच कोविड पॉझिटिव्हचे निदान यामध्ये मोठा कालावधी आपल्याला दिसला तरी व्यवस्थापनात थोडय़ा सुधारणा करून मृत्यूचे प्रमाण निश्चितपणे कमी करू.
एखादा पेशंट ताप, सर्दी, खोकला म्हणून फॅमिली फिजिशियन किंवा शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, फिव्हर क्लिनिक यात उपचारांसाठी गेला की, तापसरीचे औषध घेऊन तो एक ते दोन दिवस थांबतो. मग उच्च मध्यमवर्गीय एक्स-रे किंवा सीटी स्कॅन उतार न पडल्यास करतो, कनिष्ठ व मध्यमवर्गीय मात्र डॉक्टरच्या सल्ल्यासाठी थांबतो. आज कोविड-19च्या संसर्गित होण्याच्या भीतीने डॉक्टरही ऍग्रेसिव्हली पूर्वीप्रमाणे तपासत नाहीत. व्हिडीओ कॉलिंग, फोन कॉलिंग यावरच भर असतो. पेशंटच्या जवळ जाऊन तपासणे म्हणजे पीपीई किट आली. ते सर्व सोपस्कार आणि कोरोनाची अनाहूत भीती यामुळे डॉक्टर मंडळी साहजिकच थोडीशी बॅकफूटला आली आहेत. वैद्यकीय पेशा हे एक नोबेल प्रोफेशन आहे असे आपण मानले तरी संसर्गित होऊन मरणाऱया डॉक्टरांच्या कुटुंबीयांचे काय? किंवा पॅरामेडिक्सचे काय? हे सर्व अनुत्तरित आहे. सामान्य जनता, शासन-प्रशासन त्याचा आदरसन्मान करतील, पण पुढे…
संशयित कोविड रुग्ण आरटी-पीसीआर, स्वॅब टेस्टसाठी थोडा उशिराच जातो. अपॉइंटमेंट आणि इतर गोष्टींतून गेल्यानंतर साधारणपणे सहा तासांत टेस्ट रिपोर्ट अपेक्षित असतो. तो त्याच्या फॅमिली डॉक्टरकडे जात नाही, तो महानगरपालिकेकडे जातो. एका अर्थी बरोबरच आहे. कारण नाहीतर आपल्याला क्वॉरंटाइन करतील, हॉस्पिटलमध्ये एकटय़ालाच राहावे लागेल, फॅमिलीशी ताटातूट होईल या सर्व भीतीने रुग्ण पळून जाण्याची शक्यता असते, पण हा रिपोर्ट संध्याकाळी पाचनंतर जर मुंबई किंवा इतर कोणत्याही महानगरपालिकेकडे गेला तर त्याच्यावर कार्यवाही दुसऱया दिवशीच होते. म्हणजे जवळ जवळ चौदा ते अठरा तास निघून जातात. यामध्ये जो विलंब आहे, तो कसा कमी करता येईल याकडे गांभीर्याने नव्हे, तर काटेकोरपणे पाहिले पाहिजे.
त्या काळात पॉझिटिव्ह असणारा रुग्ण हा आपल्या फॅमिलीबरोबरच असतो. एसम्प्टेमॅटिक (Asymptamatic) रुग्ण जसे ‘स्पेड’ करण्यासाठी कारणीभूत होऊ शकतात, तसे निदान आणि रिपोर्ट यामध्ये अडकलेले रुग्ण ‘प्रेड’ करू शकतात. त्यानंतर दुसऱया दिवशी मध्यान्हाच्या सुमारास महानगरपालिका किंवा जिल्हा प्रशासनाचे लोक आपल्या यादीप्रमाणे भेट देतात. मग सुरुवात होते पेशंट केस हिस्टरी, ऑक्सिजनचे रक्तातील प्रमाण पल्स ऑक्सीमीटरवर तपासले जाते. 95 spo2 कमी असेल तर निर्णय घेतला जातो. अधिकच दम, ताप असेल तर मात्र हॉस्पिटलचा निर्णय होतो. मग इतर नातेवाईकांची म्हणजेच कुटुंबीयांची तपासणी, बिल्डिंग-चाळीमधल्या लोकांची हिस्टरी, तपासणी होते. मग रुग्ण ऍडमिट होऊन खरी ट्रीटमेंट सुरू होते. त्यानंतर प्रथम लॅबोरेटरी तपासणी. माझ्या माहितीप्रमाणे सध्या आपण ऑक्सिजन सॅच्युरेशनवर भर देत आहोत, पण इतर म्हणजे किडनी प्रोफाईल, लिव्हर प्रोफाईल, लिपिड प्रोफाईल, सीबीसी अशा मल्टिपल टेस्ट करण्यासाठी आपल्याला तो प्रोटोकॉल परिपूर्ण करणे आवश्यक. कारण नंतरच्या काळात कोरोना या व्हायरसमुळे दबलेले आजार डोके वर काढतात आणि मृत्यूस कारणीभूत होतात. जर आपण ‘डेथ ऑडिट’ पाहिले तर डायबेटिस, हृदयरोग, थायरॉईड, लिव्हर, डिसऑर्डर, फुप्फुसाचे रोग, मेंदूचे विकार, स्थूलता, इम्युनोकॉप्रमाईड रुग्ण यांचे मृत्यू झाले आहेत.
त्यामुळे यासाठी आवश्यक असलेल्या सर्व चाचण्या या एकदा नव्हे, तर वारंवार होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा रुटिन प्रोटोकॉलमध्ये समावेश झाल्यास निश्चितच मृत्युदर कमी होईल.
अमेरिकेचा मृत्युदर याच को-मॉर्बिडिटीमुळे (co-morbidity) जास्त आहे. आज काही ठिकाणी Seizures ‘एपिलॅप्सी’मध्ये ज्याप्रमाणे फिटस् येतात, त्याप्रमाणे ‘फिटस्’ येऊन मृत्यू कोविड पेशंटना आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. इटलीमध्ये, अमेरिकेत त्यामुळे EEG या टेस्टचा समावेश करण्यात आला आहे. Electro-Encephalogram चा समावेश आपल्याही प्रोटोकॉलमध्ये होणे आवश्यक आहे. म्हणजे अनाकलनीय मृत्यूचा वेध घेता येईल आणि त्याच्यामध्ये असलेल्या निदानाची उपचार पद्धती अंगीकारून मृत्युदर कमी करता येईल.
आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आपण सध्या उपचार पद्धती अवलंबत आहोत. त्याबाहेर जाऊन रोज आयसीयूमध्ये काम करणारे डॉक्टर, वैद्यकीय तसेच समाजात पेशंटना येणाऱया अडचणींचा सामना करणारे लोकसेवक, प्रतिनिधी यांचा विचार घेणे आवश्यक आहे. तसेच बरे होऊन बाहेर येणारे डॉक्टर किंवा इतर यांचेही अनुभव लक्षात घेऊन त्याची जोड देणे आवश्यक आहे.
आजही आपण व जग कोविडशी लढताना ‘ट्रायल एरर’ (Trial and Error) या मेथडचा वापर करत आहोत, पण ज्याप्रमाणे एबोला सार्स एमईआरएस या रोगाच्या साथीतून, त्यातील अनुभवातून, त्यात झालेल्या मृत्यूच्या दहशतीतून काही देश शिकले आणि त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून लिमिटेड रिसोर्स, लिमिटेड इकॉनॉमिकल परिस्थिती असताना रुग्णसंख्या, मृत्युदर आटोक्यात ठेवला. त्यासाठी शासनाने विशेष मिशन ‘मिशन झीरो डेथ’ राबवावे आणि Early, Tracing patient Early contact tracing, Early Testing, Early Reporting, Early Hospital Admission or Early quarrantining, Early Investingation For death causitive Factors, Repeated Investingation with monitoring, Early oxygenation, Early ICU and Ventilators, Early Treatment.
हे सर्व करताना रॅपिड टेस्टिंग हे इतर लोकांसाठी खूप आवश्यक आहे. ‘कम्युनिटी स्पेड’ आहे किंवा नाही या वादात पडण्यापेक्षा ‘कम्युनिटी प्रेड’ आहे असे मानूनच ‘रॅपिड ऍक्शन’ घ्यावी.
हे सर्व जर ‘सिंगल विंडो’ सिस्टीम डॅशबोर्ड वापरून झाले तर खूप सुसहय़ होईल. पेशंट, डॉक्टर, जवळचे नातेवाईक यांचा संवाद हॉस्पिटलायझेशनच्या काळात आर्टिफिशियली इंटेलिजन्स, टेलिमेडिन्स माध्यमातून होऊ दे. ती शक्ती निश्चितच बरे होण्यासाठी सहाय्यभूत ठरेल.
तसेच मृत्यूनंतरची प्रक्रियाही सुसहय़ व्हावी. डेथ सर्टिफिकेट, पोलीस स्टेशनला जाऊन 4 नंबरचा फॉर्म भरणे, पोलीस कॉन्स्टेबलची उपलब्धता आणि मग विद्युतदाहिनी, शववाहिनी उपलब्धता या सर्व गोष्टी वेदनामय न होता ‘सिंगल विंडो’तून होणे आवश्यक आहे. म्हणजेच Creamation, burrial protocol पुन्हा एकदा करावा हीच अपेक्षा!





























































