
देशातील कोरोनाचा मृत्यूदर घसरल्याची आकडेवारी समोर आली असतानाच कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस सुधारत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. देशात बुधवारपर्यंत तब्बल 9 लाख 88 हजार 29 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनाचा रिकव्हरी रेट 64.51 टक्क्यांपर्यंत सुधारला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी बुधवारी ही माहिती दिली.
मुंबईत कोरोनाची साथ आटोक्यात! इकबालसिंह चहल यांचा दावा
देशात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले गेले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांचे वेळीच निदान होत आहे. देशात सध्याच्या घडीला कोरोनाचे 5 लाख 9 हजार 447 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनावर मात केलेल्या लोकांच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास निम्मे आहे.
मिशन बिगीन अगेन; 5 ऑगस्टपासून मॉलमधील दुकाने सुरू
आम्ही कोरोनाशी लढतोय आणि जिंकतोय, अशा शब्दांत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोना लढय़ात मिळत असलेल्या यशाबाबत बुधवारी समाधान व्यक्त केले. त्यांनी ट्किटरच्या माध्यमातून ही दिलासादायक आकडेवारी शेअर केली.
कोरोना चाचण्यांचे प्रमाण 1 कोटी 77 लाख 43 हजारवर
इतर देशांच्या तुलनेत हिंदुस्थानमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण अधिक आहे. मंगळवारपर्यंत देशात एकूण 1 कोटी 77 लाख 43 हजार 740 नमुने तपासण्यात आले. मंगळवारी एका दिवशी 4 लाख 8 हजार 855 चाचण्या करण्यात आल्या, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) बुधवारी एका पत्रकाद्वारे जाहीर केले.























































