
मुंबईत आज कोरोनाचे 1,118 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 60 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 916 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या आता 85 हजार 327 वर पोहोचली आहे.
मुंबईत 60 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 244 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्क्यांवर आले आहे तर रुग्ण वाढीचा दरही वाढून 72 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली असून आता 20 हजार 124 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 5 लाख 05 हजार 982 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 11,964 वर पोहोचली.























































