राणी बागेतील ‘शक्ती’चा दिमाखदार रूबाब!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील ‘शक्ती’ वाघाचा दिमाखदार रूबाब बुधवारी मुंबईकरांना ‘लाईव्ह’ पाहता आला. निमित्त होते जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष उपक्रमाचे. यामध्ये ‘शक्ती’ वाघाच्या दिनचर्येचे अर्धा तास थेट प्रक्षेपण पालिकेच्या सोशल मीडिया फेसबुक अकाऊंटवरून करण्यात आले. उद्यान व प्राणी संग्रहालय संचालक डॉ. संजय त्रिपाठी आणि जनसंपर्वâ विभागाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.