
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र केंद्रामुळे अयोध्यानगरीचा पार कायापालट होणार आहे. 70 एकराच्या विशाल भूखंडावर भगवान रामचंद्रांचे तीन मजली भव्य मंदिर उभारले जाणार आहे. शिवाय मंदिराला सौर ऊर्जेने निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा केला जाणार आहे. हे पवित्र क्षेत्र जगभरातील पर्यटकांत लोकप्रिय व्हावे यासाठी अयोध्या नगरीचा कायापालट करून हायटेक तीर्थक्षेत्र म्हणून या नगरीचा विकास केला जाणार आहे. त्यामुळे या पवित्र नगरीच्या भेटीसाठी रोज किमान 1 लाख पर्यटक येतील असा विश्वास जन्मभूमी विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टने व्यक्त केला आहे.
ही बातमी वाचलीत का? – मुहुर्त ठरला! 5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमीपूजन























































