मोदींनी अर्थव्यवस्था आणि रोजगाराचा सत्यानाश केला, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. या काळात 10 कोटी नोकऱ्या धोक्यात आल्याची माहिती संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीतून पुढे आली आहे. यावरून कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी देशाला उद्ध्वस्त करतायत, अर्थव्यवस्था आणि रोजगाराचा सत्यानाश केला, अशा शब्दांत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

मोदींवर टीका करणे सोडा, काँग्रेसकडे लक्ष द्या! शरद पवारांनी टोचले राहुल गांधींचे कान

कोरोनानंतर गुंतवणुकीसमोरील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सादरीकरण करताना लॉकडाऊनचा मोठा फटका रोजगार वाढीला बसला आहे. जवळपास 10 कोटी नोकऱ्या धोक्यात आल्याची माहिती दिली. यासंदर्भातील बातमी ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

प्रियांका गांधींनी सरकारी बंगला सोडला!

मोदी देशाला उद्ध्वस्त करायला निघालेत. पहिली नोटाबंदी, दुसरी जीएसटी, तिसरी करोना महामारीत झालेली वाईट परिस्थिती आणि चौथी म्हणजे अर्थव्यवस्था व रोजगाराचा झालेला सत्यानाश. त्यांच्या भांडवलशाही माध्यमांनी एक भ्रम निर्माण केला आहे. हा भ्रम लवकरच तुटेल, असे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.