
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला दीड महिना उलटून गेला तरी अद्याप त्याच्या आत्महत्येचे गूढ कायम आहे. सुशांतच्या अकाली जाण्याने त्याच्या जवळच्या लोकांना धक्का बसला असून एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिनेही आपल्या मनातील भावनांचा बांध मोकळा केला आहे. सुशांतच्या मृत्यूचे वृत्त कळताच धक्का बसला आणि अजून हे स्वीकारण्यास जड जात असल्याचे अंकिताने म्हटले. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत तिने जुन्या आठवणी जागवल्या.
सुशांतने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. याबाबत अंकिता लोखंडे हिला विचारण्यात आले असता तिने हा दावा फेटाळून लावला. मी त्याला गेल्या बऱ्याच वर्षापासून ओळखते. तो असे करूच शकत नाही. माझ्यासोबत असताना मी त्याला अनेकांना प्रोत्साहन देताना पाहिले आहे, त्यामुळे तो नैराश्यातून आत्महत्या करू शकत नाही, असे अंकिता म्हणाली.
रिया चक्रवर्ती ‘विषकन्या’, सुशांतच्या हत्येची तिला सुपारी मिळाली होती!
मी गेल्या 4 वर्षांपासून त्याच्यासोबत नव्हते. आमची अखेरची भेटही 2016 मध्ये झाली होती. मात्र 7 वर्ष मी खूप जवळून त्याला पाहिले आहे. तो आपली स्वप्नं, नृत्य, टॅलेंट, अभिनय याबाबत नेहमी उत्साही असायचा. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकत नाही. त्याच्याबाबत चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, असे अंकिता म्हणाली. तसेच डिप्रेस होण्यासाठी काही तरी कारण हवे, त्याच्या कारकिर्दीचा आलेख चढता होता, तो चांगले चित्रपट करत होता, त्यामुळे तो हे पाऊल उचलू शकत नाही, असे अंकिता म्हणाली.
सुशांतचं कुटुंब रियाविरुद्ध साक्ष देण्यासाठी दबाव टाकतंय, मित्राने केला गंभीर आरोप
यामागे काही तरी कारण नक्की असणार. काही गोष्टीं कदाचित त्याला त्रास देत असतील, ज्यामुळे तो तणावात असेल. तो उच्चशिक्षित होता, असे विचार मनात येण्यापूर्वी तो स्वतःला सावरू शकत होता. त्याला माहिती होते आपल्याला काय हवंय, त्यामुळे खोट्या गोष्टींचा तमाशा बंद करायला हवा, असेही अंकिता म्हणाली.
यावेळी अंकिताने जुन्या दिवसांच्या आठवणीही ताज्या केल्या. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेचे चित्रीकरण करताना आम्ही सोबत रिक्षाने जात असायचो. तो स्टार होता. स्वप्नांच्या मागे धावणारा, ती पूर्ण करणारा सुशांत आपल्यात नाही हे पचायला जड असल्याचे यावेळी अंकिता म्हणाली.

























































